श्री हरेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संस्थेची दिनांक १५ एप्रिल १९९४ रोजी १२८, नवव्यापार भवन, ४९ पी, डिमेलो रोड कर्नाक बंदर मुंबई ४००००९ या ठिकाणी स्थापना झाली. संस्था स्थापनेवेळी केवळ ५४९ सभासद संख्या होती. पारनेर तालुक्यातील कष्टकरी, गरजू, मध्यमवर्गीय, नोकरदार/ व्यावसायिक लोकांना एकत्र आणुन संस्थेचे प्रवर्तक संस्थापक स्व. विष्णूशेठ पाटीलबा शिंदे व स्व. हरिभाऊ सोनाजी शिर्के - संस्थापक अध्यक्ष ,स्व. अप्पासाहेब रामभाऊ आंधळे व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने संस्थारूपी छोटेसे रोपटे लावले.
संस्थेचे भगवान श्री हरेश्वर या ग्रामदैवताच्या नावावरून श्री हरेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई असे नामकरण केले. संस्थेची सुरुवात करत असताना प्रथमत: जागेची अत्यंत महत्वाची समस्या होती. स्व. संस्थापक विष्णूशेठ पाटीलबा शिंदे यांनी उदात्त हेतू समोर ठेवून १२८ नवव्यापार भवन, ४९ पी, डिमेलो रोड कर्नाक बंदर मुंबई ४००००९ या ठिकाणी स्वत:च्या कार्यालयामध्ये संस्थेस जागा देवून महत्वाची समस्या सोडविली.
संस्था स्थापनेपासून आजपर्यंत सर्व आजी - माजी संचालकांनी निस्वार्थी वृत्तीने व नियोजनबद्ध कामकाज केले आहे. संस्थेच्या २८ वर्षाच्या वाटचालीचा मागोवा घेतला असता तसेच संस्थेची आर्थिक स्थितीचा विचार केला असता या कालावधीमध्ये संस्थेने केलेल्या प्रगतीचा प्रत्येक सभासदास निश्चितच अभिमान वाटेल.